हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English (इंग्रजी) हिन्दी (हिंदी)

गुरुदेव श्री श्री रविशंकर मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांततेचे राजदूत आहेत. ते आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचे संस्थापक आहेत जे विविध सेवा प्रकल्पांद्वारे योग, ध्यान आणि शक्तिशाली श्वासोच्छ्वासाच्या तंत्रांना सुदर्शन क्रियेसह व्यक्ती व समाजाच्या उन्नतीसाठी प्रोत्साहन देते. ते श्री श्री म्हणून ओळखले जातात आणि कधीकधी प्रेमळपणे त्यांना गुरुजी किंवा गुरुदेव म्हटले जाते.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्वत: चे विकास कार्यक्रम तयार केले आहेत जे सखोल, अधिक आनंददायी जीवन जगण्यासाठी तंत्र आणि साधने प्रदान करतात. त्यांनी अशी ना-नफा संस्था स्थापन केली आहेत जी वंश, राष्ट्रीयत्व आणि धर्माच्या सीमेवरील समान मानवी ओळख ओळखतात. जगातील लोकांना उन्नत करणे, तणाव कमी करणे आणि नेते विकसित करणे हे त्यांचे लक्ष्य आहे जेणेकरुन लोक आणि समाजात मानवी मूल्ये भरभराट होऊ शकतात.

संयुक्त अरब अमीरात मध्ये गुरुदेव श्री श्री रवि शंकर जींचे जल्लोषात स्वागत | UAE accords warm welcome to Sri Sri

संयुक्त अरब अमीरात मध्ये गुरुदेव श्री श्री रवि शंकर जींचे जल्लोषात स्वागत | UAE accords warm welcome to Sri Sri

November 16, 2018

फ़ुजैराच्या राज्यकर्त्यांच्या विशेष निमंत्रणानुसार गुरुदेव श्री श्री रविशंकरजी चार दिवस यूएईच्या दौ-यावर आहेत. याप्रसंगी श्री शेख हमद बिन मोहम्मद अल शर्की, सुप्रीम काउंसिलचे सदस्य, फ़ुजैराचे राज्यकर्ते तसेच शाही परिवाराचे सदस्य, अमिरात आणि भारतीय प्रतिनिधी एम.ए.यूसुफ अली, बी.आर. शेट्टी, जवाहर गंगारमानी आणि अजय खिमजी यांनी अल रुमाइलाच्या शाही महालात गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आणि आर्ट ऑफ़ लिविंगच्या प्रतिनिधिमंडळाचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

संपूर्ण लेख वाचा
योग हि काळाची गरज : श्री श्री रवि शंकरजी यांनी युरोपीय संसदेत उलगडले योग साधनेचे रहस्य | Sri Sri Ravi Shankar Demystifies Yoga For The European Parliament, Calls It The Need Of The Hour

योग हि काळाची गरज : श्री श्री रवि शंकरजी यांनी युरोपीय संसदेत उलगडले योग साधनेचे रहस्य | Sri Sri Ravi Shankar Demystifies Yoga For The European Parliament, Calls It The Need Of The Hour

June 21, 2018

ऍमस्टरडॅम मधील संमेलनात गुरुदेव म्हणाले की, "योग हे भारताची देणगी आहे, आत्ता हि संपूर्ण जगातल्या घरादारात पोहोचले पाहिजे. युरोपमध्ये आजारपण, नैराश्य ही एक चिंताजनक समस्या आहे आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग उपयुक्त ठरतो. चला तर, भावी पिढ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्याकरिता हे जग सुंदर स्थान बनवण्यासाठी आपण प्रार्थना करू या.

संपूर्ण लेख वाचा
प्रभावशाली महिला नेत्यांचे अध्यात्म आणि ज्ञानाद्वारे सक्षमीकरण | Enabling Influential Women Leaders Through Spirituality And Wisdom

प्रभावशाली महिला नेत्यांचे अध्यात्म आणि ज्ञानाद्वारे सक्षमीकरण | Enabling Influential Women Leaders Through Spirituality And Wisdom

फेब्रुवारी 25, 2018

६० देशातील महिला ज्यात २५० प्रतिनिधीं १०० ग्रामीण महिला आणि ३० पेक्षा जास्त महाविद्यालयांमधील ६० विद्यार्थीनींसह झालेल्या या परिषदेत खुले चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नेतृत्व करणा-या महिला किंवा प्रभावशाली महिलांना समाजातील जटिल समस्यांना तोंड देत असताना कोणत्या प्रकारचे अडथळे येतात, याविषयी त्यांचे विचार घेण्यात आले आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासात अध्यात्म प्रभावी कसे होऊ शकते याविषयी चर्चा करण्यात आली.

संपूर्ण लेख वाचा